चोरट्यांनी लांबिवले दोन तोळ्यांचे मंगळसुत्र

Foto

औरंगाबाद- फुटाणे घेण्यासाठी घराशेजारी जाणाऱ्या अलका देविदास साळुंके या ५५ वर्षीय महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सव्वादोन तोळ्यांचे मंगळसूत्र दोन हेल्मेटधारी चोरट्यानी दिवसाढवळ्या हिसकावून पळ काढला. ही घटना आज संध्याकाळी मयूरपार्क येथील बुद्ध विहारा जवळ घडली चोरटे cctv मध्ये कैद झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिली.